नाणे चोरले म्हणून मुलीला जाळले

May 25, 2010 5:49 PM0 commentsViews: 4

25 मे

कॉईन बॉक्स मधील नाणे चोरल्याच्या संशयावरुन 12 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळल्याची अमानुष घटना वाशिम जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

मालेगाव तालुक्यातील मुंगळा इथे ही घटना घडली.

वैशाली नावाची ही मुलगी ही रेखा नखाते हिच्या दुकानात गेली होती. त्यावेळी रेखाने वैशालीवर नाणे चोरल्याचा आरोप केला. आणि घरात घेवून तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.

यात वैशाली 80 टक्के भाजली. उपचारासाठी तिला अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण 23 मे रोजी तिचा मृत्यू झाला.

तब्बल तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रेखा नखातेवर खुनाचा आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ती सध्या फरार झाली आहे.

close