जातीनिहाय जनगणनेवर निर्णय नाही

May 26, 2010 10:30 AM0 commentsViews: 2

26 मे

जातीनिहाय जनगणनेवर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज कोणताही निर्णय झाला नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्र्यांच्या समितीकडे सोपवण्यात आला आहे.

जातीनिहाय जनगणनेबाबत यूपीएमध्येच मतभेद आहेत. पी. चिदंबरम, आनंद शर्मा हे जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात आहेत. दलित नेते आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक हेही जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात आहेत.

तर वीरप्पा मोईली , डी. एम. केचे मंत्री अझगिरी, आणि फारुख अब्दुल्ला हे जातीनिहाय जनगणनेचे समर्थन करत आहेत. प्रणब मुखजीर्ंच्या मते या माहितीचा उपयोग योजना राबवण्यासाठी होऊ शकतो.

भाजपने जातीनिहाय जनगणनेचे समर्थन केले आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र अशा जनगणनेला विरोध केला आहे.

close