पुण्यात पुन्हा कचरा साठला

May 26, 2010 11:25 AM0 commentsViews: 1

26 मे

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील गावकर्‍यांनी डेपोत कचरा टाकण्यास मनाई केल्याने पुण्यातील कचरा तसाच पडून आहे.

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला तसेच हंजर या कंपनीच्या प्रोसेसिंग प्लॅनला रविवारी आग लागली होती. यामुळे उरुळीच्या गावकर्‍यांनी आंदोलन करुन कचर्‍याच्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली. तसेच, डेपोत कचरा टाकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

याबाबत आज महापौर, प्रशासन आणि महापालिका पदाधिकारी यांची उरुळीमध्ये बैठक होणार आहे. पण या बैठकीत तरी या प्रश्नावर तोडगा निघणार का, याकडेच आता लक्ष लागले आहे.

या आंदोलनामुळे पुणे शहरात तब्बल दोन हजार टन कचरा साठला आहे.

close