ही गुंडागिरी सहन केली जाणार नाही – मुख्यमंत्री

October 19, 2008 4:01 PM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर, लातूर मनसेनं परप्रांतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मनसेची ही गुंडगिरी सहन केली जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल. रेल्वे प्रशासनानं आधीच कळवलं असतं, तर अधिक पोलीस बंदोबस्त दिला असता, असं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितलं तर मनसेच्या आंदोलनावर काँग्रेसचे सरचिटणीस संजय निरुपम यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मनसे आणि शिवसेनेच्या आंदोलनावर टीका करत परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलन करणार्‍या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच या कार्यकर्त्यांना चिथावणी देणार्‍या राज ठाकरे यांना अटक करावी, असंही ते म्हणाले. रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी राज ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळेच अशा घटना घडत असल्याची टीका केली. मनसेवर बंदी घालण्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी केंद्राकडे केली आहे तर रेल्वे राज्यमंत्री नारायणभाई राठवा यांनी रेल्वेची फेरपरीक्षा घेण्याचे संकेत दिले आहेत.

close