एअर इंडियाच्या संपाला स्थगिती

May 26, 2010 12:52 PM0 commentsViews: 3

26 मे

दिल्ली हायकोर्टाने एअर इंडियाच्या संपाला 31 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. संप अवैध ठरवण्याच्या मागणीसाठीच्या याचिकेवर ही सुनावणी झाली.

कालपासून एअर इंडियाचे 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. तर काही आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील एअरपोर्ट्सवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मंगलोर विमान अपघात ताजा असताना कर्मचार्‍यांनी असा संप करणे चुकीचे असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच एअर इंडियाने या संपाविरोधात कडक भूमिका घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

close