आदिवासी जमीन कायद्याला मुदतवाढ

May 26, 2010 1:21 PM0 commentsViews: 75

26 मे

आदिवासींच्या जमिनींना संरक्षण देण्याच्या कायद्याला सरकारने आणखी 30 वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

आदिवासींच्या जमिनींची संरक्षण मुदत 2004मध्ये संपली होती. तेव्हापासून पुढच्या 30 वर्षांसाठी हे संरक्षण वाढवले गेले आहे.

मधल्या काळात जर कुठे जमिनी विकल्या गेल्या असतील, तर त्यांची चौकशी करू आणि चुकीचे असेल तर विक्री रद्द करू, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

यामुळे आदिवासींच्या जमिनी हडपणार्‍या धनदांडग्यांना, राजकारण्यांना सरकारने चांगलीच चपराक दिली आहे.

close