एअर इंडियाचा संप मागे

May 26, 2010 1:38 PM0 commentsViews: 5

26 मे

कालपासून सुरू असलेला एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. हायकोर्टाने फटकारल्यानंतर इंजीनिअर्सनी बुधवारी आपला संप मागे घेतला.

या संपाचा हजारो प्रवाशांना फटका बसला. पण याप्रकरणी 32 कर्मचार्‍यांवर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संप मागे घेतल्यानंतर एअर इंडियांचे इंजीनिअर्स तातडीने कामावर रूजू झालेत. मुख्य कामगार आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर इंजीनिअर्सच्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला.

येत्या 4-5 दिवसात विमानसेवा सुरळीत होईल, असा विश्वास एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक अरविंद जाधव यांनी व्यक्त केला.

इंजीनिअसर्चा हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत दिल्ली हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती.

close