नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प सुरू होणार

May 26, 2010 2:42 PM0 commentsViews: 9

26 मे

नवी मुंबईतील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे.

या मार्गावर दोन वर्षांत रेल्वे धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला 500 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आधी मांडला गेला.

त्यानंतर वाढलेला एक हजार कोटी रूपयांचा भार सहन न झाल्याने रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यास नकार दिला होता.

मात्र आता हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे.

close