आंदोलन सुरू, कचरा पडून…

May 27, 2010 8:24 AM0 commentsViews: 1

27 मे

कचरा डेपोच्या प्रश्नावर गावकरी आणि प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील गावकर्‍यांचे डंपिंगविरोधात आंदोलन सुरू आहे.

त्यामुळे पुणे शहरातील कचराही गेले चार दिवस तसाच पडून आहे.

त्यातच आजच्या बैठकीतही निर्णय न झाल्याने शहरात कचर्‍याचा प्रश्न आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे.

याआधी 31 तारखेपर्यंत ओपन डंपिंग केले जाणार नसल्याचे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे देण्याची तयारीही महापौरांनी दाखवली होती.

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला 4 दिवसांपूर्वी आग लागली होती. यानंतर उरुळीतील गावकर्‍यांनी आंदोलन करत कचर्‍याची एकही गाडी डेपोत येऊ न देण्याचा निर्धार केला होता.

त्यामुळे पुणे शहरामधील कचरा उचलला गेलेला नाही.

close