आठवले राज्यसभेसाठी इच्छुक

May 27, 2010 9:01 AM0 commentsViews: 2

27 मे

राज्यात येत्या 18 जूनला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

त्याचवेळी एक महत्त्वाची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी तिसर्‍या आघाडीमार्फत आपला उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यामध्ये तिसर्‍या आघाडीचे 24 आमदार आहेत. त्यापैकी 13 आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. आता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

तिसर्‍या आघाडीने आपली ताकद पुन्हा एकवटल्यास रामदास आठवले आपला उमेद्वारी अर्ज दाखल करतील. अशा वेळी काँग्रेसने तिसरा उमेदवार उभा केल्यास, त्याच्यासह राष्ट्रवादीच्या दुसर्‍या उमेदवाराचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.

त्यामुळेच 29 मे रोजी होणार्‍या तिसर्‍या आघाडीच्या होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

close