हक्काच्या जमिनीसाठी पवना धरण खोर्‍यातील शेतकर्‍यांचं उपोषण

October 19, 2008 4:06 PM0 commentsViews: 16

19 ऑक्टोबर, मुंबईसुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या नावावर असलेली पवना धरणालगतची जमीन परत मिळावी, अशी मागणी मूळ जमीन मालकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याबरोबर मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. कृष्णा खोर्‍यातील टाटा कंपनीची सहा धरणं आणि पवना धरणासह सरकारी धरणांसाठी सरकारनं मावळ तालुक्यातली लाखो एकर जमीन संपादित केली. पण धरणं पूर्ण झाल्यानंतर त्यातली त्यातली हजारो एकर जमीन अतिरिक्त झाली. तरीही या जमिनी मूळ मालकांना परत न करता सरकारनं परस्पर बिल्डर्स आणि धनदांडग्यांच्या घशात घातल्याचं स्पष्ट झालं आहे. पवना धरणालगतची 20 एकर जमीन अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहे. पण ही जमीन पालेगावच्या ज्ञानेश्वर घुले आणि बंडू आखाडे यांच्याकडून सरकारनं धरणासाठी घेतली होती. त्यामुळं सरकारनं आपल्याला परत करण्याऐवजी अमिताभ बच्चन यांना कशी विकली, असा सवाल ज्ञानेश्वर घुले विचारत आहे. अमिताभ यांना दिलेल्या जमिनीचीच नाही तर धरणासाठी म्हणून घेतलेल्या सर्वच जमिनींच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

close