पुण्यात मंगल कार्यालयाला आग

May 27, 2010 9:38 AM0 commentsViews: 5

27 मे

पुण्यात आज शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाला आग लागली.

सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. फायर ब्रिगेडच्या सात बंबांनी दोन तासात ही आग आटोक्यात आणली.

स्वयंपाकाच्या सिलेंडरमधून गॅसगळती होऊन ही आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. या मंगल कार्यालयात एक कार्यक्रम असल्याने जेवण बनवण्यासाठी हे सिलेंडर मागवण्यात आले होते.

उन्हामुळे ही आग झटपट पसरली. यामुळे बाजूच्या दोन वाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

close