टोलविरोधात मनसेचे आंदोलन

May 27, 2010 10:52 AM0 commentsViews: 2

27 मे

नाशिक-मुंबई एक्सप्रेस वेसाठी 29 मेच्या मध्यरात्रीपासून टोल आकारणी करण्यात येणार आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने या टोल आकारणीला विरोध होत आहे.

इगतपुरीतील नागरिकांना या टोलमधून सूट मिळावी, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यासाठी आज घोटीजवळ मुंबई-नाशिक मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. या प्रकरणी 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा एक तास खोळंबा झाला होता.

close