अश्वारोहण मैदानाचे उद्घाटन

May 27, 2010 11:18 AM0 commentsViews: 3

27 मे

धाडसी पुणेकरांसाठी आता एक खास संधी उपलब्ध झाली आहे. पुण्यामध्ये कात्रज आंबेगावच्या शिवसृष्टीजवळ खास अश्वारोहण मैदान तयार झाले आहे.

या मैदानाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. तेही घोड्यावर स्वार झालेल्या बाबासाहेबांनी मशालीने ज्योत पेटवत हे उद्घाटन केले.

दिग्विजय प्रतिष्ठानने हे मैदान तयार केले आहे. चार एकरांच्या या मैदानात बेसिक रायडींग, शो जंपिंग ऍरेना, क्रॉसकंट्री जम्प्स या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उद्घाटनाच्या वेळी येथील मुलामुलींनी अनेक चित्तथरारक खेळांची प्रात्यक्षिके दाखवली.

close