वसईत प्रचाराची धामधूम

May 27, 2010 3:17 PM0 commentsViews: 7

27 मे

येत्या 30 मे रोजी वसई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे.

वसई पालिकेच्या 89 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील वॉर्ड क्रमांक 81 मधून बहुजन विकास आघाडीच्या सुषमा ठाकूर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी फिरत आहेत.

शिवसेनेतर्फे मनोहर जोशी, राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील, तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचार सभा झाल्या. वसई जनआंदोलन समितीतर्फे आमदार विवेक पंडित प्रचारात उतरलेत.

तर काँग्रेसचा राज्य स्तरावरील एकही नेता प्रचारासाठी फिरकलेला नाही.

close