कारगिल अहवालात फेरफार

May 27, 2010 3:22 PM0 commentsViews: 5

27 मे

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या कारगिल युद्धाच्या अहवालात फेरफार झाल्याचा निर्णय आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनलने दिला आहे.

युद्धाच्या बटालिक क्षेत्रातील रेकॉर्ड्समध्ये वरिष्ठ कमांडर्सनी बदल केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर ट्रिब्युनलने शिक्कामोर्तब केले आहे.

बटालिक क्षेत्रात लढणारे ब्रिगेडियर देविंदर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. बटालिक क्षेत्रातील युद्ध अहवालात तेंव्हाचे वरिष्ठ कमांडर लेफ्टनंट जनरल पाल यांनी फेरफार केल्याचा आरोप देविंदर सिंग यांनी केला होता.

या आरोपानंतर देविंदर सिंग यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली. तसेच कारगिल युद्धासाठी दिलेले मेडलही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले होते.

यानंतर तयार केलेल्या अहवालात ब्रिगेडियर सिंग यांच्या कामगिरीबद्दल त्यांना योग्य ते श्रेय देण्यात आले नव्हते, असे निरीक्षणही ट्रिब्युलने निकालात नोंदवले आहे.

close