अब्दुल समदला वाचवण्यासाठी कुटुंबीय सरसावले

May 27, 2010 3:31 PM0 commentsViews: 4

27 मे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अब्दुल समदवर खोटे आरोप होत असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पुण्यात स्फोट झाला त्या दिवशी अब्दुलने कर्नाटकात एका लग्नाला हजेरी लावली होती, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

त्या लग्नाचे व्हिडिओ शूटिंगही त्यांनी पुराव्यादाखल सादर केले. दरम्यान अब्दुलच्या चौकशीतून स्फोटाबाबत कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी एटीएसने अब्दुल समदला मंगलोर एअरपोर्टवर अटक केली आहे.

दरम्यान अब्दुल समद याचे वकीलपत्र घेण्याची तयारी मुंबईतील वकील मुबीन सोलकर यांनी दाखवली आहे.

close