पुन्हा संपाचा इशारा…

May 27, 2010 5:29 PM0 commentsViews: 3

27 मे

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 12 जूनला पुन्हा संपावर जाण्याचा इशारा एअर इंडियाच्या इंजीनिअर्सनी दिला आहे.

आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, किंवा संप अवैध ठरवला तर आम्ही लेबर कोर्टात जाऊ , हायकोर्टात जाऊ , पण आम्ही गप्प बसणार नाही, असे एसीईयुचे चेअरमन सुनील वागड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने आज कामगार युनियनबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. यापुढे युनियनची कुठलीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीही एअर इंडिया व्यवस्थापनाने दिली आहे.

तसेच सगळ्या एअर इंडिया युनियनच्या नेत्यांना त्यांनी कामावरून काढल्याची नोटीस पाठवली आहे.

त्यांच्यापैकी 30 जणांना संप पुकारल्याच्या कारणावरून अगोदरच बडतर्फ करण्यात आले आहे.

close