विलासरावांची गुगली…

May 28, 2010 11:09 AM0 commentsViews: 4

28 मे

विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही यावरून रस्सीखेच सुरू आहे.

अशातच विधानपरिषदेच्या 4 आणि राज्यसभेच्या 2 जागा काँग्रेसला मिळायला पाहिजे, असे विधान करून विलासराव देशमुख यांनी गुगली टाकली आहे.

अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच जागा वाटपाबाबत निर्णय घेतील, असे सांगून जागावाटपावरून वादग्रस्त विधाने करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी चिमटा काढला आहे.

close