‘पार्टीत फार रमू नका’

May 28, 2010 12:35 PM0 commentsViews: 2

28 मे

आयपीएल पार्टीत रमणार्‍या सहकार्‍यांना सचिन तेंडुलकरने वडिलकीचा सल्ला दिला आहे.

खेळाडूंनी जबाबदारी ओळखून वागावे, असे सचिनने म्हटले आहे. पुण्यात दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी सचिनने केली.

या वेळी लता मंगेशकरही उपस्थित होत्या.

यावेळी सचिनने डॉक्टरांच्या कामाचे कौतुक केले. क्रिकेट खेळण्यातून आनंद मिळतो. पण डॉक्टरांच्या कामामुळे एखाद्या पेशंटचा जीव वाचतो, त्यामुळे डॉक्टरच देशाचे रिअल हिरो आहेत, असे सचिन म्हणाला.

close