पुण्यात बसखरेदीसाठी उपोषण

May 28, 2010 1:05 PM0 commentsViews:

28 मे

पुणे महापालिका आणि पीएमपीच्या वादामुळे तब्बल 350 कोटींची बसखरेदी रखडली आहे. या बसेसची खरेदी ताबडतोब केली जावी, या मागणीसाठी भाजपचे नगरसेवक विकास मठकरींनी उपोषण सुरू केले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यासाठी डाव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उजव्या बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस खरेदी कराव्यात, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड पालिकेने घेतली आहे.

तर या वादात हस्तक्षेप करत, दोन्ही बाजूला दरवाजे असणार्‍या बसेस घ्याव्यात, अशी भूमिका पीएमपीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी घेतली आहे.

या वादामुळे बसेसची खरेदी मात्र रखडली आहे. ही खरेदी सुरू व्हावी म्हणून मठकरींनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

close