कचराविरोधी आंदोलन मागे

May 28, 2010 1:53 PM0 commentsViews: 1

28 मे

पुण्यातील कचर्‍याविरोधात फुरसुंगी येथील कचरा डेपोजवळील गावकर्‍यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले.

पुण्याचे महापौर आणि जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्या गावकर्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले.त्यानंतर गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले.

रविवारपासून डेपोत कचराच टाकू न देण्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतली होती. त्यामुळे पुण्यात कचरा साठून राहिला होता.

हा कचरा आता उचलला जाणार आहे.

close