कोल्हापुरवासियांची आगळी वेगळी दिवाळी

October 19, 2008 4:15 PM0 commentsViews: 55

19 ऑक्टोबर, कोल्हापूरकोल्हापुरात दिवाळीअगोदर रहिवाशांनी खड्डे दिवाळी साजरी केली. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यामुळं प्रशासनाच्या विरोधात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची एकदाही डागजुगी करण्यात आलेली नाही. त्यामुळं वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेवुन जावं लागतं. कोल्हापुरवासियांनी याबाबत अनेक वेळा आंदोलनं केली तरीही महापालिका प्रशासन काही करत नाही. त्यामुळं रहिवाशांनी खराब रस्त्याच्या विरोधात हे आंदोलन सुरु केलं. वाहनधारक आणि रहिवाशांनी शहरातील मिरजकर तिकटी परिसरात जमून खड्डयाभोवती रांगोळी काढली आणि खड्ड्याभोवती पणत्या पेटवून फटाके लावण्यात आले.

close