टँकरला 500, तर ड्रमला अडीचशे रुपये…

May 28, 2010 2:39 PM0 commentsViews: 1

28 मे

उन्हाचा तडाखा आणि पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील खेडोपाड्यात पाणी महागले आहे.

टँकरला पाचशे रूपये तर बैलगाड्यांनी पाणी पुरवठा करणारेही दोनशे ते अडीचशे रूपयांत एक ड्रम पाणी विकत आहेत.

ज्या भागात पाणी विक्री होत नाही, तिथे तर रानोमाळ भटकंती करून पाणी शोधावे लागत आहे.

अनेक ठिकाणी उन्हाचा 44 अंशावर गेला आहे. या परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आहे.

विहिरींनी तळ गाठला आहे, तर जलसाठे कोरडेपडले आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत.

close