पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

May 28, 2010 5:41 PM0 commentsViews: 3

28 मे

फायरब्रिगेड आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवी मुंबईत एका अपघातात सापडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले.

ट्रॅक कारवर येऊन आदळल्याने मधुकर सिन्हा हे कारमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी गाडीचे पत्रे कापावे लागणार होते. पण त्यासाठी दीड ते दोन तास लागणार होते.

त्याच वेळी रस्त्यावरुन जाणार्‍या एका ऍम्ब्युलन्समधून ऑक्सिजन मास्क काढून तो सिन्हा यांना लावण्यात आला. पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या या सतर्कतेमुळे सिन्हा कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत जवळपास दीड तास तग धरू शकले. नंतर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर हा प्रकार घडला. यात सिन्हा यांची पत्नी आणि मुलगा किरकोळ जखमी झाला.

close