राज ठाकरेंवर खटला दाखल करण्यास परवानगी

May 28, 2010 5:48 PM0 commentsViews: 4

28 मे

कल्याणमधील परप्रांतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंवर खटला चालवण्यास गृहखात्याने परवानगी दिली आहे.

2008मध्ये काही परप्रांतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

राज ठाकरेंवर कलम 153-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंवर यापूर्वीच 73 खटले दाखल आहेत. त्यातील 19 केसेस या महाराष्ट्राबाहेरील आहेत. यापैकी तीन केसेस या 153-अ अंतर्गत दाखल करण्यात आल्या आहेत.

यात राज ठाकरे दोषी आढळले तर त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

close