भारतीय टीमला सुरुवातीलाच धक्का

May 28, 2010 5:52 PM0 commentsViews: 2

28 मे

झिंबाब्वे ट्राय सीरिजची सुरुवात भारतीय टीमसाठी धक्कादायक ठरली आहे. पहिल्याच मॅचमध्ये भारतीय टीमला झिंबाब्वेकडून पराभव पत्करावा लागला.

286 रन्सचे आव्हान झिंबाब्वेच्या नवख्या बॅटिंग लाईन अपने यशस्वीपणे पेलले. मसाकाझा आणि ब्रँडन टेलर या ओपनर्सनी सुरुवातच दणक्यात केली. आणि 88 रन्सची ओपनिंग करुन दिली.

मसाकाझा 46 रन्सवर आऊट झाला. पण टेलरने झिंबाब्वे इनिंगची पायाभरणी केली. त्याने 81 रन्स केले. तो आऊट झाल्यावर भारतीय टीमला विजयाच्या आशा वाटू लागल्या.

पण आयर्विन आणि कोव्हेटरीने शानदार फटकेबाजी करत मॅच फिरवली. भारतीय टीमने पहिली बॅटिंग करताना पाच विकेटवर 285 रन्स केले. रोहीत शर्माने त्याची पहिली वहिली वन डे सेंच्युरी ठोकली पण त्याची ही इनिंग व्यर्थ ठरली.

close