प्रा. ग. प्र. प्रधान यांचे निधन

May 28, 2010 8:09 PM0 commentsViews: 17

29 मे

ज्येष्ठ समाजवादी विचारवंतआणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रा. गणेश प्रभाकर म्हणजेच ग. प्र. प्रधान यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे पुण्यातील हडपसरमधील साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

आज दुपारी चार वाजेपर्यंत साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर इथे पाचच्या सुमारास त्यांचे देहदान करण्यात आले. सकाळी त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

प्रधानमास्तरांना गेल्या तीन आठवड्यांपासून अशक्तपणा जाणवत होता. मागच्या शनिवारपासून त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एन. डी. पाटील, नरेंद्र दाभोळकर, प्रकाश आंबेडकर तसेच, त्यांचे चळवळीतील सहकारी किशोर पवार, जुने सहकारी रामभाऊ तुपे, मोहन धारिया, कुमार सप्तर्षी आदी मान्यवरांची प्रधान मास्तरांचे अंत्यदर्शन घेतले.

पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रधानमास्तरांचा अल्पपरिचय -

जन्म – २६ ऑगस्ट १९२२ रोजी

इंग्लिश ऑनर्स घेऊन बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण

महाविद्यालयात शिकत असताना १९४० पासून एसेम जोशी आणि ना. ग. गोरे या समाजवादी नेत्यांच्या सहवासात. त्यानंतर राष्ट्रसेवा दलात सहभाग

चले जाव लढ्यात सहभाग. येरवड्यात ११ महिने कारावास

कारावासातून बाहेर आल्यावर एम.ए.ची पदवी प्राप्त

१९४५ ते १९६५ या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन

पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे आणि कार्यकारिणीचे सदस्य

१९६६ मध्ये पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवड

एकूण १८ वर्षे अभ्यासू, आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम

१९७५ मध्ये आणीबाणीच्या विरोधात १८ महिने कारावास

विविध क्षेत्रात काम करताना लोकप्रबोधन करण्यासाठी अभ्यासपूर्ण लेखन

आणीबाणीत जेलमध्ये असताना "साता उत्तराची कहाणी' व "भाकरी आणि स्वातंत्र्य' या पुस्तकांचे लेखन

१९८६ मध्ये "स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' या ग्रंथाचे लिखाण. (१८५७ ते १९४७ या कालखंडातील स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन)

‘हाजीपीर’, ‘कांजरकोट’, ‘सोनार बांगला’ आणि ‘इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ या पुस्तकांचे लेखन

close