मुंबईतल्या ओशिवरात एका प्लास्टिकच्या कंपनीला आग.

October 20, 2008 4:59 AM0 commentsViews: 8

दिनांक 20 ऑक्टोबर, मुंबई-मुंबई मधल्या ओशिवरा भागातल्या सराफ कासकर इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या प्लास्टिकच्या कंपनीला आज सकाळी आग लागली . आग विझवण्यासाठी घटनास्थळी 12 फायर इंजिन, 8 टँकर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचं काम जोरात सुरू आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. __PAGEBREAK__ही इमारत एकमजली आहे. तळमजल्यावर युनियन बँक ऑफ इंडियाचं ऑफिस आणि पहिल्या मजल्यावर प्लास्टिक कंपनी आहे. या आगीत प्लास्टिक कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. कंपनीच्या मालकांनी काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅक्रॅलिकचं नवीन मशीन आणलं होतं. ते या आगीत जळालं. पण आग आटोक्यात आणायला फायर ब्रिगेडला यश आल्यामुळे आग पसरली नाही. त्यामुळे सुदैवानं आग तळमजल्यापर्यंत पोचली नाही.

close