मुरूडच्या समुद्रात 4 पर्यटकांचा मृत्यू

May 28, 2010 8:56 PM0 commentsViews: 6

29 मे

डॉल्फिन बघण्यासाठी पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली छोटी बोट उलटल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दापोलीजवळच्या मुरूडच्या समुद्रात घडली आहे.

यात नऊ पर्यटकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यापैकी चारजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण वरिष्ठ नागरिक आहेत.

डॉल्फिन बघण्यासाठी 12 पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली ही बोट किना-याकडे परतत होती. बोट किना-याजवळ आली असताना मोठी लाट आल्याने घाबरून हे सर्व पर्यटक बोटीच्या एका बाजूला आले. त्यामुळे बोट उलटली.

हे सर्व पर्यटक मुंबई परिसरातील असून मुरूडच्या आर्यावर्त हॉटेलमध्ये उतरले आहेत.

close