स्वच्छ राजकारणी…

May 29, 2010 11:11 AM0 commentsViews: 3

29 मे

प्रा. ग. प्र. प्रधान हे समाजकारणात जसे वावरले तसे राजकारणातही. भारताच्या राजकारणात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.आजच्या राजकारण्यांसाठी आदर्श ठरेल असेच त्यांचे आयुष्य होते.

राजकारणातील कपट, भ्रष्टाचार बाजूला ठेवून ग. प्र. अत्यंत साधेपणाने वावरले. समाजकारण हाच राजकाकरणाचा पाया हे तत्व त्यांनी पाळले. राजकारणात वावरतानाही त्यांनी सभ्यपणा, सुसंस्कृतपणा हे गुण कायम ठेवले.

विद्यार्थीदशेपासून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले होते. स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. साने गुरूजी आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता.

1965 मध्ये समाजवादी पक्षाचे काम करण्यासाठी तर त्यांनी नोकरीही सोडली. 1966 ला पदवीधर मतदारसंघातून निवडून येऊन ते विधानपरिषदेवर गेले. पुढे 1972 आणि 1978 मध्ये ते सातत्याने विधानपरिषदेवर निवडून गेले.

मास्तरांनी आणिबाणीत तब्बल 18 महिने कारावास भोगला. 1980 ते 82 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले.

1984मध्ये त्यांनी विधानपरिषदेतून निवृत्ती स्वीकारली. तरीही समाजकारण करत एका सच्च्या राजकारण्याचे कर्तव्य ते नेहमीच बजावत राहिले. आयुष्याच्या शेवटापर्यंत….

close