राष्ट्रवादी विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर

May 29, 2010 11:52 AM0 commentsViews: 4

29 मे

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत. विधानपरिषदेसाठी प्रकाश बिनसाळे रामराजे नाईक निंबाळकर, विनायक मेटे यांची नावे जाहीर झाली आहेत. तर राज्यसभेसाठी तारीक अन्वर, ईश्वरलाल जैन यांची नावे जाहीर झाली आहेत.

रामराजे निंबाळकर याआधी मंत्री होते. पण सहा महिन्यांच्या आत दोन्ही सभागृहापैकी कुठेही निवडून येऊ न शकल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्याचे राजकीय पुनर्वसन करायचे ठरवले आहे.

विनायक मेटे विधानसभेसाठी खरे तर इच्छुक होते. पण त्यांच्या मराठा राजकारणाचा फटका बसेल म्हणून ही उमेदवारी त्यांना मिळाली नव्हती. त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करण्यासाठी मेटेंना आमदारकीचे तिकीट देण्यात आले आहे.

तर प्रकाश बिनसाळे गेली 25 वर्ष बॅकरुम बॉयची भूमिका करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले बिनसाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांना शह देत तिकीट मिळवले आहे.

close