हेडलीच्या चौकशीसाठी टीम जाणार

May 29, 2010 12:04 PM0 commentsViews: 1

29 मे

मुंबईवरील दहशतवादी हल्याप्रकरणी डेव्हिड कोलमन हेडलीच्या चौकशीसाठी भारतीय तपास अधिकार्‍यांच्या चार सदस्यांची एक टीम उद्या अमेरिकेला रवाना होणार आहे.

26/11 च्या हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीचे नाव समोर आले होते. मात्र अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या हेडलीची चौकशी करण्याची परवानगी भारतीय तपास यंत्रणांना मिळत नव्हती.

पंतप्रधान मनमोहनसिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या भेटीदरम्यान हेडलीच्या तपासाची परवानगी भारताला देऊ, असे आश्वासन ओबामांनी दिले होते.

आता हेडलीच्या चौकशीची परवानगी मिळाल्याने 26/11 च्या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

close