समाजवादी पार्टीपासूनच देशाला जास्त धोका – बाळासाहेब ठाकरे

October 20, 2008 5:02 AM0 commentsViews: 38

20 ऑक्टोबर, आयबीएन-लोकमत ब्युरो -'अतिरेक्यांपेक्षा समाजवादीसारख्या जीनावादी पाटर्‌यांकडूनच भारताला जास्त धोका आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून , समाजवादी पार्टीवर टीका केली आहे. भारतात वाढणार्‍या पाकिस्तानचंच नेतृत्त्व ही मंडळी करत असून, त्यापेक्षा अमरसिंग, अबू आझमींसारख्यांनी सरळ पाकिस्तानातच जावं, असा सल्लाही त्यांना या अग्रलेखातून देण्यात आला आहे. अफझलगुरूची पाठराखण करणार्‍यांपायी, हौतात्म्य पत्करणार्‍या क्रांतिकारकांना लुटारू म्हणायचं काय , असा उद्वेगही शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केला आहे. धर्माने मुस्लीम , पण संस्कारांनी हिंदू या लेखक सलीम खान यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असं आवाहनही अग्रलेखात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 'आपलं मुस्लिमांशी वैर नसून, त्यांना वापरणार्‍या पुढार्‍यांशी, तसंच बांग्लादेशी मुस्लिमांशी वैर असल्याचंही शिवसेनाप्रमुखांनी आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.

close