ठाणे-पनवेल महिला स्पेशल सुरू

May 29, 2010 12:47 PM0 commentsViews: 2

29 मे

हार्बर लाईनवरून ठाण्याहून पनवेलला जाणार्‍या पहिल्या महिला विशेष रेल्वेचे उद्घाटन खासदार संजीव नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.

ठाणे ते पनवेल या मार्गावर आता दररोज 9 डब्यांच्या 3 महिला विशेष गाड्या धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणार्‍या महिलांसाठी महिला विशेष गाडी सोडावी, अशी मागणी महिलांकडून होत होती.

या लेडीज स्पेशल रेल्वेमुळे सकाळी कामावर जाणार्‍या महिलांना दिलासा मिळणार आहे.

यापुढे हार्बर मार्गावर लवकरच 12 डब्यांच्या गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही खासदार संजीव नाईक यांनी यावेळी दिले.

close