नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण

May 29, 2010 12:59 PM0 commentsViews: 3

29 मे

आज अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथे होणार्‍या पहिल्या विश्व नाट्य संमेलनाची तयारी आता पूर्ण झाली आहे.

शरद पवारांच्या हस्ते या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

व्हिसा मिळण्यातील अडचणी पार करून अनेक कलाकार, पत्रकार कालच न्यू जर्सीला पोहचले आहेत.

नाट्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला न्यूजर्सीतील स्थानिक कलाकारांनी युनियन काऊंटी आर्ट्स सेंटर इथे तीन एकांकिका सादर केल्या.

त्यांच्या एकांकिका पाहण्यासाठी न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कच्या आसपासच्या भागातून अनेक मराठमोळे प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते.

नाट्यसंमेलनाच्या या उत्सवाला आता न्यू जर्सीमध्ये उत्साहात सुरुवात झाली आहे.

close