विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या हातात…

May 29, 2010 1:13 PM0 commentsViews: 9

29 मे

महाराष्ट्रात 10 जूनला होणारी विधान परिषदेची निवडणूक एकूण 10 जागांसाठी होत आहे.

यानुसारकाँग्रेसने आपले 3 उमेदवार जाहीर केले आहेत. हुसेन दलवाई, दीप्ती चौधरी, संजय दत्त यांना संधी दिली गेली आहे. तर राष्ट्रवादीनेही आपले 3 उमेदवार दिलेत. आणि शिवसेनेनेही 2 उमेदवार दिले आहेत. दिवाकर रावते आणि अनिल परब यांना सेनेकडून संधी देण्यात आली आहे.

तर भाजपने शोभाताई फडणवीस आणि धनंजय मुंडेंना संधी दिली आहे. असे एकूण 10 उमेदवार जाहीर झाले आहेत.

सगळ्यांचे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या 4 जागा जिंकण्याची घोषणा केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आघाडीतील इतर मित्रपक्षांचे संख्याबळ बघता काँग्रेसची चौथी जागा निवडून येऊ शकते.

यासाठी फारच 'काँटे की टक्कर' होईल. तर मोठा घोडेबाजारही होण्याची शक्यता आहे. 2 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सुधाकर गणगणेंचा जसा पराभव झाला, तसा काँग्रेसला आपल्या चौथ्या उमेदवाराच्या पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस आपला चौथा उमेदवार जाहीर करणार का? हाच प्रश्न आहे.

close