12वीचे विषयावर टॉपर्स जाहीर

May 31, 2010 8:03 AM0 commentsViews: 11

31 मे

बारावीचे विषयावर टॉपर्स आज जाहीर झाले.

यंदा बारावीच्या परीक्षेला 13 लाख 499 विद्यार्थी बसले होते. उच्च शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच 25 मे रोजी वेबसाईटवरुन रिझल्ट जाहीर केला होता.

विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजल्यापासून त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये मार्कशिट दिल्या जातील.

उच्च शिक्षण मंडळाच्या आठ विभागांचे प्रत्येक विषयाचे टॉपर्स आज जाहीर झाले आहेत.

संपूर्ण राज्याचे टॉपर्स जाहीर करण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे.

विभागवार टॉपर्स पुढीलप्रमाणे –

नागपूर विभाग -

विज्ञान शाखा गणितात प्रथम- चिन्मय चौधरी, 100 पैकी 100 मार्क्स, लालबहाद्दूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज भंडारा.

पूजा वाघोळे – दोन विषयात पहिली, गणितात 100 पैकी 100 मार्क्स, इलेक्ट्रॉनिक विषय – 200 पैकी 198, न्यू इंग्लिश हायस्कूल नागपूर

भूगोल- कपिलदेव भिवगडे, 100 पैकी 95 मार्क्स, गांधी ज्युनिअर कॉलेज, भंडारा.

जीवशास्त्र- ज्युली चारमोडे, लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज भंडारा. 100 पैकी 100 गुण.

नाशिक विभाग

गणित – श्रेयस कुलकर्णी, आर. वाय. के. सायन्स कॉलेज. 92.83 टक्के.

इंग्रजी – सुदर्शन मारू. पी. ई. एस. ज्युनिअर कॉलेज, मालेगाव. 88.50 टक्के

मुंबई विभाग

मराठी प्रथम- गणेश रवींद्र आवटे – 100 पैकी 94 मार्क्स, केळकर वझे कॉलेज, मुलुंड

संस्कृत – मुग्धा चंद्रकांत दाते, 100 पैकी 98 मार्क्स, रामनारायण रुईया कॉलेज

गणित व संख्याशास्त्र – सचिन मोहनसिंग कंदारी, 100 पैकी 100 मार्क्स, रुपारेल कॉलेज

जीवशास्त्र – श्रृती मणी, 100 पैकी 100 मार्क्स, एसआयईएस कॉलेज, सायन

इलेक्ट्रॉनिक्स – अमेय अशोक राणे, 200 पैकी 199 मार्क्स, सेंट मेरीज हायस्कूल, वाशी

कला शाखा प्रथम – मराठी – सतेजा ठाकूर, 100 पैकी 91 मार्क्स, केईएस स्कूल, उरण

विज्ञान शाखा – इंग्रजी प्रथम – जारतैना जोखीम अंतावो, 100 पैकी 96 मार्क्स, सौमेय्या कॉलेज, विद्याविहार

कला शाखा – इंग्रजी प्रथम – दाभोळकर आशिका पराग, 100 पैकी 94 मार्क्स, रुपारेल कॉलेज

वाणिज्य शाखा – गुजराती प्रथम – पिंकेश निलेश मेहता, 100 पैकी 90 मार्क्स, सोमैय्या कॉलेज, विद्याविहार

वाणिज्य शाखा – हिंदी प्रथम विभागून – खुश्मिता अनिलकुमार बाफना, केसी कॉलेज, श्रीधर वैद्यनाथन, 100 पैकी 90 मार्क्स , व्ही. एम. कन्नड हायस्कूल, मुलुंड.

औरंगाबाद विभाग –

इंग्रजी – सलोनी मोथा, 96 मार्क्स

पाली – जबिंदा मनवील कौर, 100 पैकी 100 मार्क्स

जीवशास्त्र – मधू चव्हाण – 100 पैकी 100 मार्क्स

गणित – सपना पाटनी, 100 पैकी 100 मार्क्स

लातूर विभाग

इतिहास – मेहबूबी बाबू छोटेमिया – मुलींमध्ये सर्वप्रथम

पीकशास्त्र – सर्वप्रथम विभागून – दहातोंडे श्वेता बलराम, 200 पैकी 196 मार्क्स. श्रीराम दत्तात्रय नरवडे – 100 पैकी 196 मार्क्स

माहिती तंत्रज्ञान – आशिष राचमाळे विठठ्ल, 100 पैकी 88 मार्क्स

close