बहजन विकास आघाडीची बाजी

May 31, 2010 9:28 AM0 commentsViews: 18

31 मे

वसई-विरार महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

जनआंदोलन समितीला 19 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने हे स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

बहुजन विकास आघाडीला 89 पैकी 55 जागा मिळाल्या आहेत. तर विवेक पंडित यांच्या जनआंदोलन समितीला 19 जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनेला 3 तर भाजपला फक्त 1 जागा मिळाली आहे.

मनसेने एक जागा पटकावली असून काँग्रेसलाही दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आहे. राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही.

अपक्षांनी 8 जागा मिळवल्या आहेत.

close