औरंगाबादमधला गॅस सिलेंडर शॉर्टेज भडकला

October 20, 2008 5:23 AM0 commentsViews: 14

20 ऑक्टोबर, मुंबई – ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादच्या नागरिकांना गॅस टंचाईला सामोरं जावं लागत आहे. दोन लाख कनेक्शन असलेल्या ग्राहकांना शहरातल्या 15 एजन्सींकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र एजन्सीचे मालक कनेक्शनधारकांना गॅस न देता, चढ्या भावाने हॉटेल आणि वाहनांना गॅस पुरवठा करत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकार्‍यांनी जबाबदारी झटकल्याने ऐन दिवाळीत नागरिक अडचणीत आलेत. दिवाळीपूर्वीच गॅस सिलेंडर शॉर्टेजचा औरंगाबादमधला हा भडका. शहरातल्या सगळ्या गॅस सप्लाय एजन्सींवर सध्या रांगा लागल्या आहेत. गॅस सिलेंडर विक्रेते आणि बेजबाबदार पुरवठा अधिकार्‍यांमुळे ऐन दिवाळीत सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

close