कलकीबाबाकडून ‘ड्रग्ज’ची दीक्षा

May 31, 2010 9:47 AM0 commentsViews: 130

31 मे

आंध्रप्रदेशातली प्रसिद्ध श्री अम्मा भगवान अर्थात कलकी बाबा यांच्या आश्रमात मोक्ष प्राप्ती मिळवून देण्यासाठी साधकांना ड्रग्ज दिले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी यांनी केला आहे.

या आश्रमातील बंद खोलीत मोक्ष मिळवून देण्याच्या नावाखाली साधक महिला आणि पुरूषांना ड्रग्ज दिले जाते. त्यानंतर ड्रग्जच्या नशेत महिला आणि पुरूषांच्या होणार्‍या अवस्थेवर अम्मा भगवान हसत होते.

येत्या जुलैपासून विश्वावर आपत्ती कोसळण्यास सुरूवात होणार आहे. 2012 पर्यंतचा काळ वाईट असेल. त्यामुळे आपण दिलेल्या दैवी कवचाच्या सहाय्याने आपण वाचू शकता, असा दावा हा अम्मा भगवान करत आहेत.

भीती दाखवत हा अम्मा भगवान लोकांकडून पैसे उकळत आहे, असा आरोपही विश्वनाथ स्वामी यांनी केला आहे.

या वादग्रस्त कलकी बाबाचा काल मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मोठा कार्यक्रम झाला. व्हिडिओ कान्फरन्सिगद्वारे या कलकी बाबाने लोकांना मार्गद्रशन केले.

सगळ्यात धक्कदायक प्रकार म्हणजे कलकी बाबाच्या प्रवचनासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हे स्वत: उपस्थित होते.

तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही कार्यक्रमात या बाबाचे गुणगान गायले.

close