पुण्यात बरसल्या चिंब धारा!

May 31, 2010 1:02 PM0 commentsViews: 1

31 मे

उन्हाने तापलेल्या पुण्याला आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर आज सुखाच्या धारा बरसल्या.

मान्सूनपूर्व पावसाने आज पुणेकरांना चिंब भिजवून टाकले.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी आज दुपारी आली. त्यानंतर लगेचच पुण्यात या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

ऑफिस सुटताना अचानक आलेल्या या पावसाने सुरुवातीला पुणेकरांची तारांबळ उडवली. पण लगेचच सावरत पुणेकरांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला.

close