नालेसफाई अपूर्णच…

May 31, 2010 1:26 PM0 commentsViews: 18

31 मे

पावसाळा तोंडावर आला आहे. पण मुंबईतील नाल्यांच्या सफाईची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत.

त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पावसाळाही जीव मुठीत धरूनच काढावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत एकूण किती नाले आहेत त्यावर एक नजर टाकूयात…

मोठे नाले – 200

पूर्व उपनगरे – 90

पश्चिम उपनगरे – 102

शहर – 8

छोटे नाले – 129

पूर्व उपनगरे – 67

पश्चिम उपनगरे – 42

शहर – 20

या नाल्यांची सफाई 80 टक्के झाल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र बर्‍याच नाल्यांच्या बाहेर गाळ तसाच पडून असल्याने पाणी तुंबण्याची समस्या उद्भवू शकते.

नालेसफाईची मुदत 6 जूनपर्यंत वाढवल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेचा 31 मे पर्यंत नाले साफ करण्याचा दावा खोेटा ठरला आहे.

close