विश्व मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप

May 31, 2010 5:29 PM0 commentsViews: 6

31 मे

अमेरिकेतील न्यू जर्सीत आयोजित केलेल्या पहिल्या विश्व मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक समारोप झाला.

कृषीमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत हा औपचारिक समारोप झाला.

औपचारिक समारोप जरी झाला असला तरी अजून एक दिवस संमेलन सुरू राहणार आहे.

राहिलेल्या एका दिवसात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे विश्व मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ निर्माते मोहन वाघ यांना समर्पित करण्यात आल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले.

मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू कलाकार प्रशांत दामले यांचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, अशी घोषणा मोहन जोशी यांनी यावेळी केली.

समारोपाच्या कार्यक्रमानंतर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'शतकातील नाटक' हा आत्तापर्यंतच्या रंगभूमीचा वेध घेणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.

close