रविशंकर यांच्यावरील हल्ल्याचे गूढ कायम

May 31, 2010 5:43 PM0 commentsViews: 2

31 मे

बंगलोरमधील आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे गूढ आज अधिकच वाढले. त्यांच्यावर हल्ला झालाच नसल्याचे पोलीस आणि गृह खात्याने स्पष्ट केले आहे.

काल संध्याकाळी बंगलोरमधील श्री श्रींच्या आश्रमातून काही जणांना गाळ्या झाडण्याचे आवाज ऐकू आले. या कथित हल्ल्यात कुणीच जखमी झाले नाही. रात्री पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना एवढ्या उशिरा का सांगण्यात आले, याविषयी मात्र समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

काश्मीरमधील दहशतवाद्यांनी किंवा झारखंडमधील नक्षलवाद्यांनी आपल्यावर हल्ला केला असू शकतो, असे रविशंकर यांनी सांगितले. या गोळीबाराशी आश्रमातील कुणाचाही संबंध नसल्याचेही ते म्हणाले.

पण त्यांचे हे दोन्ही दावे गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी खोडून काढले. हा हल्ला मुळात रविशंकर यांच्यावर झालेलाच नसून ही आश्रमातील दोन भक्तांमधील लढाई असू शकते, असे चिदंबरम् म्हणाले.

close