अब्दुल समदला न्यायालयीन कोठडी

June 1, 2010 10:35 AM0 commentsViews: 1

1 जून

पुणे जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी अब्दुल समद भटकळचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

त्यापूर्वी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार काही दिवसांपूर्वीच एटीएसने अब्दुल समदला अटक केली होती.

त्याच प्रकरणी त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. पुणे बॉम्बस्फोटातील समदच्या सहभागाचा गुंता अजूनही कायम आहे.

त्याप्रकरणी त्याची चौकशी अजून सुरू आहे.

अटकेनंतर झालेल्या तपासात समदची पुणे स्फोटाप्रकरणी चौकशीही करण्यात आली. पण त्याचा या स्फोटाशी संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

close