अक्षरधाम हल्ल्यातील आरोपींना फाशी कायम

June 1, 2010 10:45 AM0 commentsViews: 6

1 जून

गुजरातच्या अक्षरधाम मंदिर हल्ला प्रकरणातील तीन आरोपींची फाशीची शिक्षा गुजरात हायकोर्टाने कायम केली आहे.

या प्रकरणातील एकूण सहा आरोपींपैकी तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

एकाला जन्मठेप, एका आरोपीला 10 वर्षांची तर आणखी एकाला 5 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली होती.

दरम्यान गुजरात हाय कोर्टात या निर्णयाविरूद्ध याचिका दाखल करण्यात आली.

गुजरात हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत कोर्टाचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.

close