वर्ल्डकपची तिकीटविक्री आजपासून

June 1, 2010 10:50 AM0 commentsViews: 6

1 जून

क्रिकेट वर्ल्डकप 2011 स्पर्धेला आता काहीच महिन्यांचा अवधी उरला आहे.आशिया खंडात होणार्‍या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे.

स्पर्धेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज मुंबईत बीसीसीआयच्या हेडक्वार्टरमध्ये महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला आयसीसीचे पदसिध्द अध्यक्ष शरद पवार, सीईओ हरून लोगार्ट तसेच बीसीसीआयचे सीओओ रत्नाकर शेट्टी उपस्थित होते.

वर्ल्डकप स्पर्धेची तिकिटविक्रीही आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

यापैकी 5 टक्के तिकिटांची ऑनलाईन विक्री आजपासून सुरू झाली. यातील पहिले तिकिट शरद पवार यांना देण्यात आले.