सीएनजीच्या दरात वाढ

June 1, 2010 11:25 AM0 commentsViews: 4

1 जून

सीएनजी गॅसच्या दरात 5 रुपये 60 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे यापुढील काळात सीएनजी गॅसवर चालणार्‍या टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही महागणार आहे.

सीएनजी गॅसची दरवाढ ही पुढच्या आठवड्यापासून लागू होणार आहे.

तसेच नॅचरल गॅसच्या दरात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा परिणाम खतांची निर्मिती आणि वीज निर्मितीवर होणार आहे.

पण त्यामुळे खतांच्या किंमती वाढ होणार नाही. मात्र विजेचा दर एक रुपयाने वाढण्याची शक्यता आहे, असे सूतोवाच केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वीच केले होते.

close