पुण्यात पुन्हा वादळी पाऊस

June 1, 2010 11:38 AM0 commentsViews: 2

1 जून

पुण्यात आज पुन्हा वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस झाला.

अरबी समुद्रातील पेट वादळामुळे पुण्यात कालपासून जोरदार पाऊस होत आहे. हे वादळ मान्सूनच्या प्रवासासाठी उपयोगी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या वादळी पावसाने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. ही झाडे इलेक्ट्रिक वायर्सवर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. सॅलीसबरी पार्क भागात मोठमोठी झाडे पडल्याने काही घरांचे प्रचंड नुकसान झाले.

पुरंदर तालुक्यातही वादळी वार्‍यांसह गारांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

close